
रत्नागिरी, 12 June : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 14 जून 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय वाहनाने दापोली येथून हर्णे बंदराकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता हर्णे बंदर येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता हर्णे बंदर येथून पाजपंढरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता पाजपंढरी येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी बाबतची पाहणी व चर्चा. सकाळी 11.30 वाजता हर्णेपाज फिशिंग अँड ट्रेडींग सहकारी संस्थेत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मच्छिमारांशी चर्चा. दुपारी 12.30 वाजता हर्णेपाज फिशिंग अँड ट्रेडींग सहकारी संस्थेतून आंजर्ले ता.दापोली कडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता आंजर्ले ता. दापोली येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी बाबतची पाहणी व चर्चा. दुपारी 1.10 वाजता आंजर्ले ता. दापोली येथून आडे उटंबर येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व चर्चा. दुपारी 1.45 वाजता आडे उटबंर, ता. दापोली येथुन केळशी येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व चर्चा. दुपारी 2.30 वाजता केळशी ता. दापोली येथून वाल्मिकीनगर (बाणकोट) ता. मंडणगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता वाल्मिकीनगर (बाणकोट) ता. मंडणगड येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व चर्चा. दुपारी 4.00 वाजता वाल्मिकीनगर (बाणकोट) ता. मंडणगड येथून जंगल जेट्टीने बागमंडला जि.रायगडकडे प्रयाण.














