रत्नागिरी (आरकेजी): इंग्लड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरीकन्या ऐश्वर्या सावंतची भारतीय संघात निवड झाली असून मंगळवारी ती इंग्लडला रवाना झाली आहे. जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दिक्षित, खो-खो असो.चे राज्य सरचिटणीस संदीप तावडे, क्रिडा शिक्षक विनोद मयेकर, ऐश्वर्याचे प्रिशक्षक पंकज, शाळेपासूनचे मार्गदर्शक, राज्य पंच राजेश कळंबटे यांनी ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या.
तालुकास्तरापासून खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या रत्नकन्या ऐश्वर्या सावंत हिने जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी केली होती. राज्य, केंद्र सरकारचे खो-खो मधील सर्वोच्च पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला होता. इंग्लड येथे आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे. भारतीय संघातून ऐश्वर्या सावंत हिची निवड झाली होती. खो-खो च्या भारतीय संघात निवड होणारी ऐश्वर्या कोकणातील एकमेव खेळाडू आहे.