मुंबई, (निसार अली) : भारतीय बौद्ध महासभेचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोकराव मुकुंदराव आंबेडकर यांचे आज शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास अल्पशा आजाराने जे. जे. रुग्णालयात निधन झाले.
अंतयात्रा उद्या शनिवार दि. 9 रोजी अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरुन निघेल. दादर चैत्यभुमीजवळील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, संदेश व राजरत्न ही मुले असा परिवार आहे.