रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष अशोक वालम यांना एका गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर नाटे पोलिसांनी पुन्हा दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली आहे.
जमावबंदी आदेशाचा भंग केलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक वालम यांच्यासह पाच जणांना या गुन्ह्यात राजापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राजापूर कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र दर रविवारी नाटे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.
अशोक वालम यांना या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर नाटे पोलिसांनी आंबेरकर मारहाणी प्रकणाच्या गुन्ह्यात त्यांना पुन्हा अटक केली आहे. वालम यांच्यासह आणखी एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.