मुंबई : हिंदुजा समूहाचा आघाडीचा ब्रँड अशोक लेलँडने आज हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत (एचपीसीएल) ‘सडक का साथी‘ ही विशेष सुविधा प्रदान करण्यासाठीसमझोता करार केला आहे. ‘सडक का साथी‘ हा व्यावसायिक वाहनांना रस्त्यावर काही बिघाड झाल्यास किंवा इतर गरजेनुसार मदत, साहाय्य सेवा उपलब्ध करवूनदेण्याचा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. अशोक लेलँड व एचपीसीएलचे संयुक्त-ब्रँडेड उत्पादन असलेल्या इंधन फ्युएल कार्डचे सर्व धारक तसेच एचपीसीएलच्याड्राइव्हट्रक प्लस कार्डचे सर्व धारक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. भारतातील १ लाखांहून जास्त व्यवसायिक वाहनांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.
ब्रेकडाऊन मदतीसाठी अशोक लेलँडने चालवलेला डिजिटल प्लॅटफॉर्म ‘सर्विसमंडी‘मार्फत ही सेवा देशभरात सर्वत्र उपलब्ध करवून दिली जाईल. यामध्ये अशोक लेलँडच्यासर्विस चॅनेल्समार्फत तातडीने संपर्क साधून बिघाडाचे नेमके कारण तपासले जाईल तसेच त्यानुसार आवश्यक सेवा पुरविली जाईल. अतिशय तत्परतेने ही सेवा पुरविलीगेल्यामुळे अगदी थोड्या कालावधीत वाहन पुन्हा रस्त्यावर धावू लागते. सर्व ब्रँड्सच्या व्यवसायिक वाहनांना या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच एका मर्यादितअंतरापर्यंत मोफत टोईंग सुविधेचाही यात समावेश आहे.
एचपीसीएलसोबत करण्यात आलेल्या या सहयोगाबद्दल बोलताना अशोक लेलॅंडचे अध्यक्ष धीरज हिंदुजा यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांना त्यांच्या रोजच्याव्यावसायिक कामांमध्ये अधिकाधिक मूल्य मिळवून देऊन त्यांना आमच्या सेवांचा जास्तीत जास्त चांगला अनुभव घेता यावा यासाठी अशोक लेलँडमध्ये आम्ही नेहमीचप्रयत्नशील असतो. अशोक लेलँडच्या कस्टमर सोल्युशन्स बिझनेसच्या ‘सडक का साथी‘ हा दुसरा उपक्रम आहे ज्यामध्ये आमच्या कंपनीच्या ‘आपकी जीत, हमारी जीत‘ या ब्रिदवाक्यानुसार आमच्या ग्राहकांना अनोख्या सेवा उपलब्ध करवून देण्याचा संकल्प केला आहे. आमच्या ग्राहकांना इंधन फ्युएल कार्ड्स देण्यासाठी आम्ही याआधीएचपीसीएलसोबत भागीदारी केली होती, याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही या सहयोगात पुढचे पाऊल उचलतआहोत.”
एचपीसीएलच्या रिटेल विभागाचे कार्यकारी संचालक जी एस व्ही प्रसाद यांनी सांगितले, “हिंदुस्थान पेट्रोलियम हे आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा प्रदानकरण्यासाठी व गरजेच्या वेळी त्यांची मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. म्हणूनच आम्ही अडचणीत असलेल्या वाहनांना रस्त्यावर मदत उपलब्ध करवून देण्यासाठीअशोक लेलॅण्डसोबतची आमची भागीदारी पुढे नेत आहोत. आमच्या ग्राहकांसोबत दीर्घकालीन घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यावर, त्यांना सर्वोत्तम उत्पादने, सेवाउपलब्ध करवून देण्यावर आमचा भर असतो. हिंदुस्थान पेट्रोलियम व अशोक लेलँड या दोन्ही कंपन्यांची वाटचाल तंत्रज्ञानाने प्रेरित असून जागतिक दर्जाची सर्वोत्तमउत्पादने व सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी त्या वचनबद्ध आहेत.”