मुंबई: अशोक लेलँड या हिंदुजा समूहाच्या प्रमुख कंपनीने व भारतातील एका सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादकाने भारतात प्रीमिअम श्रेणीमध्ये ऑयस्टर ही अत्याधुनिक एसी मिडी-बस दाखल केली आहे. अशोक लेलँडची ऑयस्टर ही बहुउद्देशीय प्रीमिअम एसी बसून असून ती कर्मचारी व पर्यटक यांच्या प्रवासासाठी तिचे डिझाइन व निर्मिती इन-हाउस केली आहे. अतिशय आकर्षक स्मायली फेस, आलीशान अंतर्भाग व अतिशय सोयीची निरनिराळी वैशिष्ट्ये असणारी ऑयस्टर ही 41 रिक्लायनिंग सीट असणारी या श्रेणीतील सर्वोत्तम एसी मिडी-बस आहे. ऑयस्टर बस हे दर्जेदार अनुभव देणाऱ्या नावीन्यपूर्ण व नव्या तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे, कारण ‘बेस्ट डिझर्व्ह्ज द बेस्ट’!
ऑयस्टर बस दाखल केल्याबद्दल बोलताना, अशोक लेलँडचे सीओओ अनुज कथुरिया म्हणाले, “अशोक लेलँड बसेस विश्वासार्हतेसाठी आणि कमी खर्चासाठी लोकप्रिय आहेत. यामुळेच त्यांनी बस श्रेणीमध्ये आघाडी घेतली आहे. या आघाडीच्या अनुषंगाने आम्ही नेहमी अग्रेसर राहतील अशी उत्पादने व तंत्रज्ञान सादर केले आहे आणि त्यांनी या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड यश मिळवलेल्या ऑयस्टरमुळे आम्हाला आघाडीचे स्थान आणखी बळकट करायचे आहे. ‘आपकी जीत, हमारी जीत’ या आमच्या ब्रँडच्या विचारसरणीनुसार, ऑयस्टर आरामदायीपणा, सुरक्षितता व कामगिरी या बाबतीत बेंचमार्क निर्माण करणार आहे.”
यानिमित्त बोलताना, अशोक लेलँडचे मीडिअम अँड हेव्ही कमर्शिअल व्हेइकल बिझनेस हेड संजय सारस्वत यांनी सांगितले, “प्रवाशांचा प्रवासात घालवावा लागणारा वेळ वाढतो आहे आमि बाजारात आरामदायी व सुरक्षित वाहतूक पर्यायाची आवश्यकता आहे. ऑयस्टर हे उत्पादन ही गरज पूर्ण करते आणि प्रवासाचा सुखद अनुभव देते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही बस सर्वोत्तम व नवी आहे आणि ती ग्राहकांच्या अपेक्षांनुसार तयार केली आहे. वाहनांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी अरगॉनॉमिक डिझाइन, आकर्षक रूप व दर्जेदार कामगिरी करणारी वाहने प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद वाटतो.”
(ऑयस्टरविषयी):
इंजिन:
Proven and Reliable H- Series -4 Cylinder iEGR diesel BS4 compliant engine Maximum Power: 95 kW Maximum Torque: 450 Nm |
ऑयस्टर बसची ठळक वैशिष्ट्ये:
· आकर्षक स्मायली फेस · रोलओव्हर कॉम्प्लिमेंट – खात्रीशीर सुरक्षितता · AIS 052, AIS 140 व AIS 153 या नव्या बस कोड नॉर्मचे पालन · उच्च क्षमतेचे 28kW एसी – दर्जेदार कूलिंग · 41 रिक्लायनिंग सीट – या श्रेणीतील सर्वोत्तम · टिल्ट व टेलिस्कोपिक स्टीअरिंग, केबल शिफ्ट गिअर मेकॅनिझम – चालवण्याच्या सुलभतेमुळे चालकाची अधिक उत्पादकता व सुरक्षा · इंधन टाकीची क्षमता 185 लिटर |
प्रवाशांसाठी फायदे:
· कमालीच्या उन्हाळ्यामध्ये दिलासा मिळण्यासाठी उच्च क्षमता असणारे एसी कूलिंग · कमी आवाज व कंपने – अन्य वाहनांच्या तुलनेत शांत प्रवास · आरामदायी व निवांत प्रवासासाठी आर्म रेस्ट असणाऱ्या रूंद रिक्लायनिंग सीट · सोपी व सोयीची वैशिष्ट्ये – मोबाइल चार्जिंगची सोय, रीडिंग लॅम्पसह एकात्मिक एसी लोव्हर्स व साइड लगेज बूथ |