ढाका : अशोक लेलँडने बांग्लादेशातील ढाका येथे नवा असेंबल प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा आज केली. १५ महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. एकूण ३७ एकरांवर हा प्रकल्प वसविण्यात आला आहे. अशोक लेलँड आणि बांग्लादेशातील आयएफएडी ऑटोज लिमिटेड यांच्या भागीदारीतून हा प्रकल्प आकारास येत आहे.
अशोक लेलँड ही हिंदुजा ग्रूपच्या नेतृत्वाखालील कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहनांची उत्पादक कंपनी अशी तिची ओळख आहे.
अशोक लेलँड लिमिटेडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विनोद के. दासरी म्हणाले की, अशोक लेलँडसाठी बांग्लादेश ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. भागीदारीतील कंपनीसह आम्ही या क्षेत्रात भरीव कार्य करू.
आयएफएडी ऑटोज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तस्कीन अहमद म्हणाले की, “बांग्लादेश हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे. या परिस्थितीत अशोक लेलँड व्हेईकल्स देशाच्या पायाभूत सुविधांसाठी वरदान ठरू शकेल.
प्लांटची क्षमता
सर्व प्रकारच्या श्रेणीतील ८०० वाहने प्रत्येक महिन्याला तयार करण्याची क्षमता
सर्वोत्तम उत्पादनांची साधने आणि जडणघडणीची सामग्री
गाड्यांचे सांगाडे तयार करणे आणि गाड्यांची तपासणी करणे अशा अत्याधुनिक सुविधा
कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी वास्तव्याची सुविधा असेल