मुंबई : हिंदुजा समूहाचा प्रमुख ब्रँड आणि भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या अशोक लेलँड कंपनीला प्रतिष्ठित एऑनचा 2019 मधील भारतातील सर्वोत्तम एम्प्लॉयरचा पुरस्कार मिळाला आहे. गुणवत्तेसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती अमलात आणून ब्रँडला आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धात्मक फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्यांच्या पडताळणीतून हा पुरस्कार दिला जातो.
बेस्ट एम्प्लॉयर इंडिया 2019 ही एऑनच्या आशियातील एऑन आशियातील प्रमुख अहवालाची 12 वी आवृत्ती आहे. कर्मचाऱ्यांचे हित साधणाऱ्या व्यावसायिक पद्धती समभागधारकांना उच्च मूल्य मिळवून देतातच, शिवाय कर्मचारी उलाढाल कमी करतात तसेच ग्राहकांचे समाधान वाढतात या तत्वार हा अहवाल आधारित आहे. एऑनने 2001 मध्ये आशियात सर्वोत्तम एम्प्लॉयरसाठीचे संशोधन सुरू केले व त्यामागे कशाप्रकारे कंपन्या मनुष्यबळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक फायदा तयार करू शकतात आणि काम करण्यासाठी पसंतीचे ठिकाण कशाच्या आधारे बनू शकतात याची अंतर्गत माहिती पुरवण्याचा हेतू ठेवण्यात आला होता.
या विक्रमी टप्प्याविषयी अशोक लेलँडच्या एचआर, कम्युनिकेशन आणि सीएसआर विभागाचे अध्यक्ष श्री. एन. व्ही. बालाचंदर म्हणाले, ‘अशोक लेलँडमधील हलकेफुलके वातावरण आणि काळजी घेणारी संस्कृती कंपनीच्या यशाच्या प्रमुख आधारस्तभांपैकी एक आहेत. अशोक लेलँडकडे केवळ ग्राहकच नाही, तर आमचे कर्मचारी आणि एऑन टीमही विश्वासार्ह ब्रँड म्हणून पाहाते हे जाणून घेणे सुखावह आहे. ‘आप की जीत, हमारी जीत’ हे आमच्या ब्रँडचे तत्व केवळ ग्राहकांसाठीच नाही, तर सर्व समभागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठीही लागू होणारे आहे. एऑनच्या 2019 मधील सर्वोत्तम एम्प्लॉयर्सच्या यादीत आघाडीचे स्थान मिळवणे आमच्यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम तसेच कर्मचाऱ्यांसाठी पूरक वातावरण पुरवण्यासाकरता आणखी प्रेरणा देणारे आहे. हा पुरस्कार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांची पावती देणारा आहे. हा आमच्यासाठी विक्रमी टप्पा असून यापुढेही आम्ही उद्योगक्षेत्रासाठी आणखी उंच मापदंड तयार करत राहू.’
या घोषणेविषयी आपला दृष्टीकोन व्यक्त करत एऑनच्या टॅलेंट अडव्हायजरीचे संचालक डॉ. आशिष अंबास्ता म्हणाले, ‘भारतातील सर्वोत्तम एम्प्लॉयर्सच्या या उच्चभ्रू वर्तुळात अशोक लेलँडचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वाहन उद्योगातील आव्हानात्मक स्पर्धात्मक वातावरण लक्षात घेता कंपनीने कायम योग्य गुणवत्तेची भरती करून त्यांचा भविष्यातील नेतृत्व स्थानांसाठी विकास करण्यावर भर दिला आहे. वैशिष्ट्यपूर्ण उत्तराधिकार योजना आणि पुढील व्यवस्थापकाच्या प्रभावीपणासाठी रोडमॅप तयार करण्याच्या पद्धतीमुळे कंपनीला इतर कंपन्यांमध्ये वेगळेपण ठसवणे शक्य झाले आहे.’
अशोक लेलँडमध्ये अभिनव संस्कृती तयार करण्यात आली असून त्याला काही उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना स्वतःची गुणवत्ता आणि क्षमता दाखवण्याची संधी मिळते. इम्प्रुव्ह आणि अध्यक्षीय पुरस्कार यांसारखे उपक्रम टीम्सना कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या किंवा प्रभावी कार्यक्षमतेसाठी उपयोगी पडू शकतील अशा त्यांच्या वास्तववादी संकल्पना मांडता येतात. कंपनीचा स्टार्ट- अप संस्कृतीवर विश्वास असून कंपनीने रोड साइड असिस्टन्ससाठी ‘सर्व्हिस मंडी’ हे अभिनव डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यासाठी मदत केली आहे. आज हे व्यासपीठ ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. त्याचप्रमाणे कंपनीची कर्मचारी धोरणे आणि गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या क्षेत्रात सर्वोत्तम असून कर्मचाऱ्यांद्वारे त्यांची प्रशंसा केली जाते. त्यातूनच कंपनीचा स्वप्रेरित कर्मचारी वर्ग तयार झाला आहे, जो दर वर्षागणिक कंपनीची कामगिरी उंचावण्याच्या ध्येयासाठी तळमळीने काम करते.
एऑन हेविट कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा हा सखोल अभ्यास गेल्या दोन दशकांपासून सातत्याने वार्षिक पातळीवर घेतला जातो व त्यासाठी 7300 जागतिक संघटनांमधील कर्मचारी कल्याण उपक्रमांचा अभ्यास केला जातो. कर्मचाऱ्यांसाठी पूरक वातावरण, आकर्षक एम्प्लॉयर ब्रँड, प्रभावी नेतृत्व आणि उच्च कामगिरीला प्रोत्साहन देणारी संस्कृती यातून निष्ठावान आणि उत्पादनक्षम कर्मचारी वर्ग तयार होतो आणि त्यातून दमदार व्यावसायिक निष्कर्ष मिळतात या तत्वाला या अभ्यासामुळे चांगला पुरावा मिळाला आहे.