चेन्नई : हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडने आज कंपनीला केएसआरटीसीकडून ३०१९ बसेसचे कंत्राट मिळाल्याचे जाहीर केले. एकाच ओईएम कंपनीला राज्य वाहतूक संस्थेकडून मिळालेल्या सर्वात मोठ्या कंत्राटांपैकी हे एक कंत्राट असून ते चालू आर्थिक वर्षात पूर्ण केले जाईल. यामुळे बसेस क्षेत्रात अशोक लेलँड कंपनीचे आघाडीचे स्थान आणखी मजबूत होईल. या कंत्राटाचे मूल्य ६५० कोटी रुपये आहे.
कंत्राटाविषयी विनोद के. दासरी, व्यवस्थापकीय संचालक, अशोक लेलँड म्हणाले, केएसआरटीसीसारख्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या कंत्राटाचे पुरेपूर मूल्य देण्याची क्षमता हे आमचे दर्जेदार तंत्रज्ञान आणि नाविन्यता तसेच कमी किंमतींना मिळालेली पावती आहे.’
टी. वेंकटरामन, वरिष्ठ उपाध्यक्ष, ग्लोबल बसेस, अशोक लेलँड म्हणाले, ‘आमच्या बसेस टिकाऊ, दमदार आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आहेत. त्यांची किंमत आणि एकंदर अनुभव हा इंडस्ट्रीत सर्वोत्तम आहे. बाजारपेठ तसेच ग्राहकांसाठी काय चांगले आहे याविषयीचे सखोल ज्ञान आम्हाला इतरांपासून वेगळे बनवते आणि त्याचमुळे केएसआरटीसीकडून कंत्राट मिळवण्यासाठी मदत झाली आहे.’
हे कंत्राट केएसआरटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी, बीएमटीसी आणि एनईकेआरटीसी यांच्या गरजा पूर्ण करेल. या कंत्राटामध्ये २१० इंची, डब्ल्यूबी, २१० डब्ल्यूबी चासीसवर पूर्णपणे बांधलेल्या कर्नाटक सारिगे बसेस, २२२ इंची डब्ल्यूबी चासीसवर पूर्णपणे बांधलेल्या राजहंस बस, २२२ इंची डब्ल्यूबीवर पूर्णपणे बांधलेल्या नॉन- एसी स्लीपर कोचेस आणि २०५ इंची डब्ल्यूबी चासीसवर पूर्णपणे बांधलेल्या मिडी बस यांचा समावेश आहे.