“इंटेलिफॅब्रिक्स” ब्रँडअंतर्गत नव्या उत्पादनाची घोषणा
भारतात हैक व्हायरॉब्लॉक तंत्रज्ञान (HeiQ Viroblock technology) आणण्यासाठी ‘अरविंद’ने स्विस टेक्स्टाईल इनोव्हेटर हैकसोबत (HeiQ) केली हातमिळवणी
या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जाणार ‘अरविंद’ची शर्टींग व सुटिंग कापडे, तयार कपडे आणि फेस मास्क्स
अहमदाबाद, १० जून : कापड आणि कपडे म्हणजे सर्रास डोळ्यासमोर येते ती फॅशन पण आता कोविड-१९ ने सगळीच समीकरणे बदलवून टाकली असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात विषाणूनाशक कपड्यांची निकड निर्माण झाली आहे. कापड उत्पादनापासून रिटेल विक्रीपर्यंत कार्यरत असलेला भारतातील आघाडीचा उद्योगसमूह अरविंद लिमिटेडने आपल्या “इंटेलिफॅब्रिक्स” या ब्रँडअंतर्गत भारतात प्रथमच अँटी-व्हायरल टेक्स्टाईल तंत्रज्ञान सादर करत असल्याची घोषणा आज केली. क्रांतिकारी विषाणूनाशक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी ‘अरविंद’ने टेक्स्टाईल इन्नोव्हेशनमधील आघाडीची स्विस कंपनी हैक मटेरियल्स एजी व तैवानच्या स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेसर्स जिनटेक्स कॉर्पोरेशन यांच्यासोबत भागीदारी केली आहे.
संशोधनातून असे आढळून आले आहे की, कापडाच्या पृष्ठभागावर विषाणू व जंतू दोन दिवसांपर्यंत सक्रिय राहू शकतात. हैक व्हायरॉब्लॉकने प्रक्रिया करण्यात आलेले कापड विषाणूंचा संपर्क झाल्यास त्यांना नष्ट करते आणि त्यामुळे कापडांमार्फत रोगजंतूंचा फैलाव होण्याची शक्यता कमी होते.
“इंटेलिफॅब्रिक्स” या ब्रँडअंतर्गत विषाणूनाशक कापड सादर केले जात असल्याची घोषणा करताना अरविंद लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. कुलीन लालभाई यांनी सांगितले, “कोविड-१९ मुळे जगभरात सर्वत्र अनिश्चितता पसरली आहे. अशा काळात आमचे ग्राहक सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही व्हायरॉब्लॉक हे क्रांतिकारी तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी हैकसोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीअंतर्गत काम करण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत आणि लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये आम्ही अशी कापडे आणि कपडे सादर करू ज्यामुळे विषाणूंपासून सर्वात चांगले संरक्षण तर पुरवले जाईलच शिवाय ते फॅशनेबल देखील असतील.”
हैक व्हायरॉब्लॉक हे स्विस टेक्स्टाईल इन्नोव्हेटर कंपनी हैकने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील सर्वात आधुनिक विषाणूनाशक उत्पादनांपैकी एक आहे. हैक व्हायरॉब्लॉकमुळे विषाणूंचा नाश करण्याची क्षमता वाढते व विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता ९९.९९% ने कमी होते. सार्स-सीओव्ही-२ संदर्भात अशी क्षमता असल्याचा दावा करणाऱ्या जगातील पहिल्या टेक्स्टाईल तंत्रज्ञानांपैकी हे एक तंत्रज्ञान आहे. हैक व्हायरॉब्लॉकची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की प्रक्रिया करण्यात आलेल्या कापडांवर ३० सौम्य, घरगुती धुण्यांपर्यंत देखील हे सक्रिय राहते त्यामुळे कपड्याच्या सर्वसामान्य जीवनकाळामध्ये ग्राहकांना सुरक्षिततेची हमी मिळते.
या भागीदारीबद्दल बोलताना हैक ग्रुपचे सीईओ कार्लो सेन्टोनझे यांनी सांगितले, “हैक व्हायरॉब्लॉकमध्ये आमच्या अत्याधुनिक सिल्वर आणि व्हेसिकल तंत्रज्ञानाचा विशेष मेळ साधला गेला आहे, जे मानवी कोरोना विषाणू २२९ई आणि सार्स-सीओव्ही-२ या कोविड-१९ ला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंच्या विरोधात सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे ३० मिनिटात विषाणूमध्ये ९९.९९% घट होते. हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि हायपोअलेर्जेनिक आहे, याचे पेटंट अद्याप यायचे आहे. नावीन्यासाठी नावाजल्या जाणाऱ्या ‘अरविंद’ या ब्रँडसोबत भागीदारी करून भारतामध्ये त्यांच्या सर्व उत्पादनांसाठी हे तंत्रज्ञान देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
नाविन्याचा ध्यास हा ‘अरविंद’च्या प्रगती आणि यशाच्या मुख्य आधारस्तंभांपैकी एक आहे. फायबरमध्ये नावीन्य आणण्यापासून ते पर्यावरणाला अनुकूल फॅशनपर्यंत ‘अरविंद’ने फॅशन क्षेत्रात नवक्रांती घडवून आणली आहे आणि सतत नवनवीन उत्पादने सादर करून जगभरातील हाय-फॅशन ब्रॅंड्सना सक्षम केले आहे. टेक्निकल टेक्स्टाईल्सचे आपले ज्ञान वापरून ‘अरविंद’ने पीपीई सूट्स आणि मास्क्स तयार करून कोविड-१९ विरोधातील लढाईत आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. आता आपल्या इंटेलिफॅब्रिक्स या ब्रँडअंतर्गत विषाणूनाशक कापडे सादर करून अजून एक नवक्रांती घडवण्यासाठी ही कंपनी सज्ज झाली आहे.