
दगडी चाळीचा रॉबिन हुड आणि गॅंगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजेच अरुण गुलाब गवळी ऊर्फ डॅडी यांच्या ७०व्या वाढदिवसाबद्दल ‘दगडी चाळ २’च्या संपूर्ण टीमतर्फे त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. अरुण गवळी यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित या चित्रपटात मकरंद देशपांडे यांची प्रमुख भूमिका आहे.















