मुंबई : श्री.श्री रविशंकर जी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग चा प्रचार प्रसार करीत झटत असलेल्या सदस्यांनी रविवारी घाटकोपर येथील माणिकलाल विभागात वृक्षारोपण केले. सचिन मटाले, नितीन मटाले, दिपक दादा, रंजना रोकडे, बाबाजी रोकडे, वनिता मटाले आणि पत्रकार प्रशांत बढे यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंग चे कार्य, समाजातील विविध विषय आणि व्हिजन यावर सविस्तर चर्चा केली. जिथे अभ्यास उद्यान उभारायचे आहे, त्या माणिकलाल विभागात हे वृक्षारोपण केले गेले. आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व सामाजिक कार्याला शुभेच्छा देत भविष्यात शक्य ती मदत नक्की करणार आहे, असे पत्रकार प्रशांत बढे यांनी सांगितले.