मुंबई, (निसार अली) : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात असणार्या अर्नाळा समुद्र किनारपट्टीवरील अर्नाळा गावाला भरतीच्या लाटांचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे येथे राहणार्या मच्छीमारांच्या अनेक घरांची पडझड झाली आहे. पालघरच्या जिल्हाधिकार्यांनी या गावाची पाहणी करावी आणि नुकसान झालेल्या मच्छीमारांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार विकास संघटनेचे अधक्ष महेश तांडेल यांनी केली आहे.