
मुंबई : दिल्लीच्या कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरनं यावर्षी मुंबईच्या वसंतराव पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके काॅलेज आॅफ आर्किटेक्चर ला मान्यता दिलीय.त्यामुळे आता मुंबईत आर्किटेक्चरला जाणा-या मुलांसाठी ४० जागा वाढल्या आहेत. आर्किटेक्चर कौन्सिल ही मान्यता मुंबईतल्या काॅलेजला दिल्यानं आता राज्यातल्याही आर्किटेक्चरच्या जागांमध्ये वाढ झालीय राज्यात आर्किटेक्चर महाविद्यालये ६५ आहेत .त्यामध्ये २६०० विद्यार्थ्यी प्रत्येक वर्षी शिकून बाहेर पडत असतात.मुंबई शहरात आर्किटेक्चर ची दोन तर उपनगरात ११ काॅलेज आहेत .त्यामध्ये ९०७ जागा आहेत . मुंबई शहरात दरवर्षी ९०७ एवढी प्रवेश क्षमता असल्यानं तंत्रशिक्षण संचालनालया व्दारे घेतल्या जाणा-या सामाईक प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतात.मात्र मर्यादीत प्रवेश क्षमता असल्यानं ,मुंबईतल्या अनेक विद्यार्थ्यांना मुंबई बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं,मुंबईतल्या वसंतदादा प्रतिष्ठानचे आर्किटेक्चर काॅलेज हे मुंबई शहरात पूर्व द्रूतगती मार्गावर ७.५ एकरात उभं आहे. या संस्थेव्दारे गेली २८ वर्षे इंजिनिअरिंग महाविद्यालय चालवण्यात येतंय .या काॅलेज मध्ये तंत्रशिक्षण विभागाच्या अटी प्रमाणे प्रयोगशाळा,ग्रंथालय आणि इमारत अस्तित्वात आहे.
आता पर्यंत मुंबईत दिल्लीच्या कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरच्या अटी पुर्ण करून आर्किटेक्चर काॅलेज सुरू करणे हे खूपच जिकीरीचं होतं ,त्यामुळं या काॅलेजची संख्या मर्यादीत आहे. या वर्षी मुंबईत एका काॅलेजला मान्यता मिळाल्यानं मुंबईतल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर ची पदवी पूर्ण करण्यास सोयीचं जाईल.यासाठीची प्रवेश प्रक्रिया२६ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याचं ,वसंतदादा प्रतिष्ठानचे सचिव अॅडव्होकेट आप्पासाहेब देसाई यांनी सांगितल. विद्यार्थ्यांना येथे सामाईक प्रवेश प्रक्रियेव्दारे तसंच थेटही प्रवेश घेता येईल,असंही अॅड.देसाई यांनी सांगितलं















