मुंबई । मनसे प्रमुख आणि तरुणाईचे अतिशय आवडते व्यक्तिमत्त्व राजसाहेब ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्त विक्रोळी कन्नमवार नगर येथे राहणारे प्रसिद्ध कलाकार निलेश चौहान यांनी राज यांचे चित्र
स्टॅम्प पॅडच्या शिक्क्याचा वापर करत तयार केलं आहे. निलेश यांचा मुलगा युग यानेही ही कलाकृती तयार करण्यासाठी मदत केली आहे. ही कलाकृती साकारून या पिता पुत्राने राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त ‘मनसे’ शुभेच्छा दिल्या आहेत.
“मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. सर्व सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच असे” असे राज यांनी सांगितलं आहे. म्हणूनच त्यांना डिजिटल शुभेच्छा देण्यासाठी निलेश आणि त्यांचा मुलगा युग यांनी 14/06/2020 या तारखेच्या शिक्क्याचा वापर करत ही कलाकृती तयार केली आहे. ती तयार करण्यासाठी 5 तासांचा वेळ लागला.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिक कोरोना संकटात धैर्याने काम करत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी मी कलाकृती तयार करण्याचे ठरवले. यासाठी स्टॅम्पपॅडची निवड केली. स्टॅम्प पॅडच्या शिक्क्यापासून कलाकृती तयार केली आहे, असे निलेश यांनी सांगितले.