जागतिक मंदी, आरोग्याच्या बाबतीत संकट, आर्थिक प्रगतीची धूसर शक्यता, सामाजिक अशांतता या कॉर्पोरेटच्या सर्वात मुख्य चिंता
मुंबई, 14 मे : कन्झ्युमर इन्साइटविषयीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर, टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनीने आज दुसरा अहवाल प्रकाशित केला आहे. “टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स 2020″ असे शीर्षक असणारा हा अहवाल 8 एप्रिल ते 4 मे 2020 या कालावधीत 16 शहरांतील 101 कॉर्पोरेटच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरासरी 66.1 आठवडे (16.5 महिने) लागतील, तसेच संपूर्ण आरोग्य सुरळित होण्यासाठी 15 आठवडे (3.8 महिने) लागतील असे कंपन्यांना वाटत असल्याचे टीआरए सर्वेक्षणामध्ये आढळले आहे.
टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रमौली यांनी अहवालातील निष्कर्षांविषयी सांगितले, “जागतिक मंदी ही भारतीय कॉर्पोरेटपुढील सर्वात मोठी चिंता असून, वरी इंडेक्सवर जागतिक मंदी 66% आहे, त्यानंतर चिंतेचा विषय आरोग्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हे आहे आणि त्याचे प्रमाण 59% आहे. व्यवसाय टिकाव धरू शकणे, भारतातील आर्थिक स्थितीच्या वाटचालीचा निराशाजनक अंदाज व सामाजिक अशांतता हे तीन घटक वरी इंडेक्सवर 57% असून, सध्या भारतातील कॉर्पोरेटसमोर असलेली अनेक आव्हाने दर्शवत आहेत. ग्राहकांचा ढासळलेला आत्मविश्वास हा वरी इंडेक्सवर सर्वात खाली, म्हणजे 39% असून ‘थोडे चिंतीत’ असे दाखवतो. कदाचित, कॉर्पोरेट सध्या अडथळे ठरणाऱ्या मोठ्या घटकांचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते.”
“कोविडमुळे झालेला परिणाम विचारात घेता, इम्पॅक्ट इंडेक्सवर सर्वात वरच्या स्थानी या वर्षाचे उत्पन्न, 75% होते, त्यानंतर 64% परिणाम झालेल्या जाहिरातींचा नंबर होता. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मागणी किरकोळ असल्याने तातडीने नियंणात आणता येतील, अशा खर्चांमध्ये कपात केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट होते”, असे चंद्रमौली यांनी नमूद केले.
अप्पर मॅनेजमेंटमध्ये कोपिंग-वरी तफावत सर्वाधिक, म्हणजे 32% असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. सर्व गोष्टींची सांगड घालण्याचे आव्हान वरिष्ठ व्यवस्थापनासमोर आहे. अप्पर मॅनेजमेंटपुढचे आणखी एक आव्हान म्हणजे, व्यक्तिशः भीती व चिंता वाटत असली तरी बाहेरून मात्र क्षमता व ताकद दाखवणे.
कॉर्पोरेटसमोरील प्राधान्यक्रम विचारात घेता, 69.5% प्राधान्य असणारी OPEX कपात सर्वात वरच्या स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर, 65.5% प्राधान्य असणारी CapEx कपात आहे. बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी 64.5% प्राधान्य, कंपनी ऑपरेशन्सना 56.5% प्राधान्य आहे आणि अनेकांचा विश्वास बसणार नाही पण मनुष्यबळासाठीच्या खर्चामध्ये कपात करणे, यास सर्वात शेवटचे, म्हणजे 51.5% प्राधान्य आहे.