मुंबई : मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असणाऱ्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, युद्ध विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, युद्ध विधवांचे पाल्य यांनी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये शालांत परीक्षा (इ.१० ), उच्च माध्यमिक परीक्षा (इ.१२ ), डिप्लोमा आणि पदवी परीक्षेमध्ये ६० % पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता दि. १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.