New Delhi : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ. भा. फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) यांनी खालील निवेदन प्रसृत केले आहे:
कृषी कायदे रद्द करा आणि शेतीमालाला किमान आधारभूत दराची हमी देणारा कायदा करा, या मागण्यांसाठी चालू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी लढ्याने दहाव्या महिन्यात प्रवेश केला आहे. मोदी सरकार लढत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास हटवादीपणे नकार देत आहे. मोदी सरकारच्या या हटवादीपणाचा धिक्कार करत डावे पक्ष मोदी सरकारने त्वरित हे कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपी ची हमी द्यावी, राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाईन रद्द करावी आणि श्रम संहिता मागे घ्याव्यात अशी मागणी करत आहेत. भारत बंद यशस्वी करण्यासाठी डाव्या पक्षांच्या सर्व घटकांनी त्वरीत कामाला लागावे, अशी हाक आम्ही देत आहोत. या भारत बंदला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन डावे पक्ष करत आहेत.
सीताराम येचुरी, महासचिव, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), डी. राजा, महासचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, देवव्रत विश्वास, महासचिव, अ. भा. फॉरवर्ड ब्लॉक, मनोज भट्टाचार्य, महासचिव, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, दीपंकर भट्टाचार्य, महासचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) – लिबरेशन आदी डाव्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आवाहन केले आहे.