मुंबई : अपना बाजारच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज दिनांक १३ नोव्हेबर २०२२ रोजी एकाचवेळी मुबई मध्ये ७ ठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याला स्पर्धकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
स्पर्धा ठिकाण ६ सहयोगी संस्था मराठा मंडळ मुलुंड,मुंबई या ठिकाणी अंबरनाथ ते विक्रोळी येथून खूप मुलांनी उत्स्फूर्त भाग घेतला. स्पर्धा ठिकाण ६ ची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या पदाधिकारी तसेच सभासदांनी खूप मेहनत घेतली. तसेच स्पर्धेला संदिप कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. तसेच अपना बाजार मुलुंडच्या कमिटी सदस्य यांनी व सेवकांनी देखील खूप मेहनत घेतली.