मुंबई : सावंतवाडी तालुक्यातील मौजे सोनुर्ली येथील दिलीप बील्डकॉन प्रा.लि. कंपनीने परवानगी पेक्षा अधिक गौण खनीज उत्खनन केल्याप्रकरणी अहवाल प्राप्त होताच कारवाई करु, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सदस्य भरतसेठ गोगावले यांनी परवानगी पेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले, बील्डकॉन कंपनीला 1 लाख 50 हजार ब्रास काळादगड हे गौण खनिज उत्खननासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु या कंपनीने परवानगी व्यतिरिक्त जास्तीचे उत्खनन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्यक्ष किती ब्रास उत्खनन केले हे निश्चित करण्यासाठी इटीएस मशिनद्वारे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश यापूर्वीचे दिलेले आहेत. संबंधित कंपनी दोषी आढळल्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. इटीएस मशिन उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा नियोजन निधीमधून खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असेही पाटील म्हणाले.