नवी दिल्ली : अनुसूचित जातीतील अंदाजे १२ लाख कलाकारांच्या आर्थिक विकासासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एकत्रित येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळा दरम्यान आज एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
देशातील अनुसूचित जातीतील कलाकारांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.