रत्नागिरी,(आरकेजी) : अणूस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. आज दुपारी ही घटना घडली. त्यामुळे पाचलवरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक एकेरी सुरु होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मोठ्या दरडी रस्त्यावर आल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. परिस्थिती आता नियंत्रणात आहे, असे सांगण्यात आले.