रत्नागिरी (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील ऐनवली गावातील तरुणीच्या मृत्यूचं गुढ आता वाढलं आहे. 28 डिसेंबर रोजी अंकिता जंगम या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी आता वेगळं वळण घेतले आहे.
अंकिता हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी संदेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, शिल्पा चव्हाण, गणेश राजेशिर्के आणि संजय भैया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम संबधातून तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा या पाच जणांविरोधात आरोप आहे. अंकिताच्या आईने या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.