चिपळूण : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकार संघटनेच्या वतीने 13 वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन चिपळूण येथे 13 व 14 नोव्हेंबर 2018 कालावधीत संपन्न झाले. यावेळी मुंबईतील पत्रकार अनिल बबन चासकर यांना पत्रकारितेसह अनेक सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या संमेलनाचे उदघाटन आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्मिळ वर्तमानपत्र प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी खासदार विनायक राऊत नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, आमदार सदानंद चव्हाण, जिल्ह्यातील विविध विविध वर्तमान पत्राचे संपादक उपस्थित होते .
पत्रकारांपुढील आव्हाने आणि पत्रकारितेची विश्वासार्ह्यता याविषयावार चर्चा सत्र आणि परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, समीरण वाळवीकार, सकाळचे मल्हारराव अराणकल्ले, विश्वास मेहेंदळे, दूरदर्शनचे जयू भाटकर, भाजपा नेते माधव भंडारी, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आणि एबीपी माझाचे प्रसन्न जोशी आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातून 400 पत्रकार यावेळी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून 9 पत्रकारांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल ही देशातील पत्रकार आणि मित्रांची एकमेव संघटना आहे, अशी माहिती केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांनी दिली.