रत्नागिरी (आरकेजी): विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा परावभ केला. शिवसेनेने नाशिक आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघात विजय मिळवला. तर अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातील जागा कायम राखण्यात भाजपला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे सध्या एक जागा राखण्यात यश आले आहे. मात्र काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा गड उध्वस्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. सुनील तटकरे यांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना 620, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार ऍड राजीव साबळें यांना अवघी 306 मतं पडली. तर 12 मतं बाद ठरली. तब्बल 314 मतांनी अनिकेत तटकरे हे निवडून आले. शिवसेनेची हक्काची मतं फुटल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. या निवडनुकीत शिवसेना उमेदवारांची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे होती. मात्र आदेशावर चालणाऱ्या शिवसेनेची मत या निवडणुकीत फुटल्याने घरचा भेदी कोण हे शोधण्याचं काम आता शिवसेनेला करावं लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या मतदारसंकडून घातून भाजपचे मितेश भांगडीया, परभणी-हिंगोली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी, काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातून), राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) निवडून आले आहेत.