~ एका वर्षांत १४४.२ टक्क्यांनी वाढ ~
मुंबई, ७ जानेवारी २०२२: फिनटेक कंपनी एंजेल वनने (पूर्वीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) डिसेंबर २०२१ मध्ये दमदार वाढीची नोंद केली आहे. कंपनीच्या क्लाएंट्सची संख्या वाढून ती ७.७८ दशलक्ष झाली आहे, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १४४.२ टक्क्यांनी अधिक आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेत १९.४ टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एंजेल वनचे एकूण क्लाएंट संपादन वाढून ०.४६ दशलक्ष झाले, मागील वर्षीच्या तुलनेत हे ११०.४ टक्क्यांनी अधिक आहे. या फिनटेक कंपनीने, डिसेंबर २०२० पासून, आपल्या क्लाएंट्सच्या संख्ये ४.७७ दशलक्षांची भर घातली आहे. अर्थातच एक वर्षात क्लाएंट्सची संख्या दुप्पट केली आहे.
एंजेल वनच्या या विभागातील तंत्रज्ञानात्मक वर्चस्वाखेरीज, अन्य अनेक बाबींनी कंपनीच्या २०२१ मधील एकंदर वाढीला हातभार लावला. या फिनटेक कंपनीने स्मार्ट मनी, इन्स्टा ट्रेड यांसारखे प्लॅटफॉर्म्स सुरू केले आणि आपल्या वेगाने वाढणाऱ्या क्लाएंट्सना अनेकविध सेवा देण्यासाठी थर्ड-पार्टी भागीदारीही केल्या. स्मॉलकेस, व्हेस्टेड, सेन्सिबुल आदींशी केलेल्या सहयोगांमुळे एंजेल वनच्या क्लाएंट्सना एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक गुंतवणूक सेवांचे लाभ मिळत आहेत.
कंपनीच्या वाढीचा मार्ग अॅव्हरेज डेली टर्नओव्हरमधून (एडीटीओ) दिसून येतो. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १७२.० टक्क्यांनी वाढ होऊन, डिसेंबर २०२१ मध्ये, तो ७.०३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या अॅव्हरेज क्लाएंट फण्डिंग बुकने मागील वर्षाच्या तुलनेत १५७.४ टक्क्यांची वाढ साध्य करून ते १५.१२ अब्ज रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे ऑर्डर्सची संख्या ६४.५७ दशलक्षांनी वाढली, मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १०६.९ टक्के आहे. तर एकंदर इक्विटी बाजारातील कंपनीचा वाटा २०.८ टक्क्यांनी वाढला, मागील वर्षीच्या तुलनेत हा विस्तार २८२ बेसिक पॉइंट्स इतका आहे.
आर्थिक वर्ष २२च्या तिसऱ्या तिमाहीत, एंजेल वनने आपले आत्तापर्यंतचे सर्वोच्च क्लाएंट संपादन केले. या काळात कंपनीने १.३४ दशलक्ष नवीन क्लाएंट्स मिळवले, मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण १६१.८ टक्के अधिक आहे. अॅव्हरेज डेली टर्नओव्हर (एडीटीओ) वाढून ६.९४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचला, आत्तापर्यंतचा सर्वाधिक तिमाही एडीटीओ कंपनीने नोंदवला, गेल्या वर्षातील या कालखंडाच्या तुलनेत तो २०७.२ टक्के अधिक होता. अशा पद्धतीने कंपनीचा इक्विटी बाजारातील एकंदर वाटाही २०.९ टक्के झाला. याशिवाय कंपनीने ऑर्डर्सच्या संख्येमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ११७.२ टक्के वाढ साध्य करून, ही संख्या १८०.१३ दशलक्षांवर नेली.
एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी, कंपनीच्या डिसेंबरमधील दमदार वाढीबद्दल म्हणाले, “आमची तंत्रज्ञानात्मक प्रगती आणि नवीन पिढीतील गुंतवणूकदारांपर्यंत, विशेषत: श्रेणी २ व ३ तसेच त्यापलीकडील शहरांतील गुंतवणूकदारांपर्यंत, पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न यांची परिणती या दमदार कामगिरीत झाली आहे. लक्ष्यित वाढीच्या मार्गांप्रती आम्ही ठेवलेल्या सर्वांगीण दृष्टीकोनामुळे सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. नववर्षात पाऊल ठेवताना आम्ही नवीन मार्ग शोधण्यासाठी तसेच आमच्या क्लाएंट्सचा गुंतवणूक प्रवास अखंडित राखण्यासाठी सज्ज आहोत.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “व्यवसायाच्या सर्व मापदंडांवर, गतवर्ष एंजेल वनसाठी उत्तम गेले. आम्ही आमच्या क्लाएंट्सना तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या प्रगत, मूल्यादारित सेवा देऊ शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो. आमच्या वाढीच्या धोरणाबाबत आम्ही योग्य मार्गावर आहोत हे आकडेवारीतून स्पष्ट दिसून येत आहे. नवीन वर्षात आम्ही तंत्रज्ञानाधारित सोल्युशन्स वापरून तसेच आमच्या सेवांची श्रेणी विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्न कायम राखू.”