~ मे महिन्यात ०.४३ दशलक्ष ग्राहकांची नोंद; वार्षिक ३०० टक्क्यांएवढी वृद्धी ~
मुंबई, ८ जून २०२१: ब्रोकिंग क्षेत्रातील आपली विक्रमी घोडदौड कायम राखत, फिनटेक ब्रोकर एंजेल ब्रोकिंगने मासिक ग्राहक नोंदवण्यात स्वत:चाच विक्रम मोडला. या फिनटेक ब्रोकरने मे महिन्यात ०.४३ दशलक्ष ग्राहकांची नोंद केली. मार्च २०२१ मधील ०.३८ दशलक्ष ग्राहकांच्या पूर्वीच्या विक्रमापेक्षा ही आकडेवारी १३% जास्त असून वार्षिक ३०० टक्क्यांएवढी वृद्धी झाली आहे.
एंजेल ब्रोकिंगची विक्रमी वृद्धी ही कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) च्या आधारे असून याद्वारे ग्राहक अनुभव वाढण्यास मदत होते. या प्लॅटफॉर्मचा ग्राहकवर्ग आता ४.८४ दशलक्षांपर्यंत पोहोचला असून मे २०२० च्या तुलनेत तो १४०.४ टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे सरासरी ग्राहक फंडिंगही वाढली असून ती १०८.९ टक्क्यांनी वाढून ११.७४ अब्ज रुपये एवढी झाली आहे. दमदार तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा लाभ घेत एंजेल ब्रोकिंगने मे २०२१ मध्ये ८६.४९ दशलक्ष ट्रेड्स केले. मागील वर्षानंतर ही ११७.९ टक्क्यांची वृद्धी आहे.
एंजेल ब्रोकिंगचे मुख्य विकास अधिकारी, श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजेल ब्रोकिंगमध्ये आम्ही अत्याधुनिक आयटी सुविधा विकसित केल्या आहेत. येथे सर्व कामे तंत्रज्ञानाद्वारे चालतात. एआय आणि एमएलवर आम्ही विशेष भर दिला असून याद्वारे ग्राहकांसाठी सर्वाधिक संपत्ती तयार करण्याची सुनिश्चिती केली जाते. या तंत्रज्ञान पैलूचे मूल्य ग्राहक आणि ट्रेडर्सना सोन्यात दिसून आले. त्यामुळेच ते एंजेल ब्रोकिंगमध्ये सहभागी झाले. एंजेल ब्रोकिंगच्या टीमसह सर्व स्टेकहोल्डर्स, आमचे भागीदार आणि यापेक्षा जास्त आमच्या ब्रँडच्या समर्थकांचे या यशासाठी आम्ही आभार मानतो.”
एंजेल ब्रोकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण गंगाधर म्हणाले, “भारतीय ब्रोकिंग इंडस्ट्रीने शिखर गाठले असून उच्च वृद्धीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. तसेच, पूर्णपणे समाधान मिळेल, असेच ब्रोकरेज लोक निवडतील. त्यासाठी इथे ग्राहक केंद्रित सेवा आणि प्लॅटफॉर्म असून याद्वारे संपूर्ण परिवर्तन घडेल. या आघाडीवर एंजेल ब्रोकिंगने फुल-स्टॅक प्रॉडक्ट आणि सेवांचा महत्त्वपूर्ण लाभ घेतला. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सच्या सर्व कौशल्यविषयक पातळ्यांना आम्ही तंत्रज्ञानाद्वारे सुविधा पुरवतो. कारण हेच आमच्या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.”
एंजेल ब्रोकिंगचा एकूण एडीटीओ वार्षिक स्तरावर मे २०२१ मध्ये ७७८.०% वाढून ४.७५ ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचला. मे २०२१ मध्ये एकूण रिटेल इक्विटी टर्नओव्हर मार्केट शेअर २३.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. ही आकडेवारी वर्षभरातच तीन पटींनी वाढलेली आहे.