मुंबई, १२ ऑगस्ट २०२१: फिनटेक प्लॅटफॉर्म एंजेल ब्रोकिंग लिमिटेडने, स्वत:चे ‘एंजेल वन’ म्हणून ब्रँडिंग केल्यानंतर, लिंक्डइन मोहीम सुरु केली आहे. यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रोफाइलवरील आडनाव बदलून ‘वन’ केले. कंपनीने एजन्सी पार्टनर्स आणि अधिकृत व्यक्तींनाही सोशल मीडियावर ‘वन’ हे आडनाव करण्यासाठी एक आठवडाभर संपर्क साधला होता.
ब्रँडच्या नव्या नावाचा प्रचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचे त्यांचे कव्हरर फोटोदेखील अपडेट केले. त्यावर एंजेल ब्रोकिंग हे आता ‘एंजेल वन’ आहे, असे वाक्य होते. #एंजेलफॉरऑलसोबत सोशल मीडियावर रिब्रँडिंगवरील मुख्य ब्रँड फिल्मसह चॅनेलवर चर्चाही घडवून आणली.
जेन झेड आणि मिलेनिअल्समध्ये आणखी नाते जोडण्यासाठी, फिनटेक प्लॅटफॉर्म एंजेल ब्रोकिंगने अलिकडेच ‘एंजेल वन’ म्हणून रिब्रँडिंग केले आहे. एंजेल वन हे नवीन ब्रँडचे नाव, या प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांच्या संपूर्म समूहाचे प्रतिनिधित्व करते. दरम्यान, कंपनीची कॉर्पोरेट ओळख एंजेल ब्रोकिंग लिमिटेड हीच राहील.
पूर्वी, एंजेल ब्रोकिंग हा एक पारंपरिक प्लॅटफॉर्म होता. मात्र नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत वर्षानुवर्षे त्यांनी स्वत:त बदल केला. एंजेल वन या मेमेंटोमध्येही ग्राहक सेेवेकरिता तितकेच समर्पण आणि वचनबद्धता आहे, जे एंजेल ब्रोकिंगचे वैशिष्ट्य होते. तो ग्राहकांचा विश्वासू भागीदार राहील. वन-स्टॉप फिनटेक प्लॅटफॉर्मम या नात्याने, कंपनीने स्मार्टफोनद्वारे आर्थिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या टेक-सॅव्ही मिलेनिअल्स आणि जेनझेड करिता नवे व्यासपीठ निर्माण केले आहे















