मुंबई, 11 जून : भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र पूर्णपणे सेवा देणा-या डिजिटल ब्रोकिंग कंपनीपैकी एक एंजल ब्रोकिंग लिमिटेडने मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त नवे मासिक अकाउंट उघडण्याची कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी बजावली आहे. ग्राहक संख्येतील वाढीमुळे मंचावरील दैनंदिन व्यापारात वाढ झाली असून एकाच दिवसात सुमारे २ दशलक्षांपेक्षा अधिक व्यवहार होत आहेत. यामुळे एंजलच्या मार्केटमधील मल्टी सेगमेंट लीडरशिपला आणखी बळकटी मिळाली आहे.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल ब्रोकिंग ही पहिली डिजिटल संस्था आहे, ग्राहक केंद्रीकरणावर लक्ष ठेवत, आघाडीच्या डिजिटल टूल्स आणि मंचावर भांडवल निर्मिती करते. पारंपरिक ब्रोकिंग फर्मच्या तुलनेत एक चांगला पर्याय म्हणून आमच्या डिजिटल ब्रोकिंग सेवेचे प्रदर्शन करण्यासाठी सध्याचे देशव्यापी लॉकडाउन आमच्यासाठी एक संधी ठरले. संशोधन आणि सल्लागारांच्या मूल्यवर्धित सेवांसह, सरलीकृत किंमतीची रचना, यामुळे ग्राहकांनी आम्हाला प्राधान्य दिले. विशेषत: टिअर२ , टिअर३ शहरांमध्ये ही स्पर्धा मोठ्या फरकाने दिसून आली.’
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय अग्रवाल म्हणाले, ‘एंजल ब्रोकिंगने भारतात किरकोळ व्यापार करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणले असून विस्तृत वित्तीय उपायांची ऑफर दिली आहे. नव्या युगातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांची योग्य साथ देत आश्वासनांची पूर्तता करून, डिझायनिंग, अंमलबजावणी, ग्राहकांचे अधिग्रहण या टप्प्यांमध्ये आमच्या मंचाची कार्यक्षमता वृद्धींगत करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.’