~ डिजिटल ब्रोकरचा ‘एंजेल वन’मध्ये बदलाचा प्रवास दर्शवतात ~
मुंबई : एंजेल ब्रोकिंग लिमिटेड रिब्रँडिंग करत अनेक दशकांच्या प्रवासात आणखी एक अध्याय जोडत आहे. अनेक वर्षांपासून डिजिटल-फर्स्ट धोरणाद्वारे पूर्ण-सेवा ब्रोकरेज आणि सल्लागाराची सेवा देत, कंपनीने सर्व आर्थिक सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन प्रदान केले. गुंतवणूकदारांच्या नव्या पिढीसाठी तंत्रज्ञान व आर्थिक सेवा एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये कंपनीने स्वत:चे ‘एंजेल वन’असे रिब्रँडिंग केले आहे. कंपनीच्या ब्रँड फिल्मद्वारे एबीएल हा जेनझेड आणि मिलेनिअल्ससाठी, विशेषत: टिअर २ आणि टिअर ३ शहर व त्यापलिकडील लोकांसाठी तरुण, आकर्षक आणि नावीन्यपूर्ण ब्रँड म्हणून प्रतीत होतो.
२० सेकंदाच्या ३ ब्रँड फिल्ममध्ये ग्राहकांना पारदर्शकतेसह इक्विटीत गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या नियम-आधारीत इंजिन एआरक्यू प्राइमकडून शिफारशी प्राप्त करण्यास, सक्षम बनवण्याकरिता कंपनीचे नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स दर्शवलेले आहेत. एंजेल ब्रोकिंग लिमिटेड ही पारंपरिक ब्रोकरेज कंपनी म्हणून सुरु करण्यात आली होती, परंतु आता ती एक फिनटेक ब्रँड बनली असून, ती विमा, कर्ज, म्युच्युअल फंड इत्यादी सर्व आर्थिक गरजांसाठी अनेक डिजिटल सोल्युशन्स प्रदान करेल.
वन स्टॉप सोल्युशन्सच्या एकदम नव्या स्वरुपात, फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे समकालीन गरजांनुसार प्लॅटफॉर्म तयार करण्याची कंपनीची वचनबद्धता दिसून येते. #एंजेलवनफॉरऑलसह सोशल मीडिया चॅनलवर शेअर केलेल्या फिल्मद्वारे कंपनीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेत, कशा प्रकारे ग्राहकांचा अनुभव वाढवण्याकरिता इंडस्ट्री फर्स्ट सोल्युशन्स तयार केले, हे दर्शवले आहे.
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर, श्री प्रभाककर तिवारी म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत झालेले ब्रँड फिल्म्स हे तरुण मिलेनिअल गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याच्या तसेच त्यांना अखंड ट्रेडिंगचा अनुभव देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. त्यांना आमचे नवीन ब्रँड नाव ‘एंजेल वन हे ओळखीचे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. याद्वारे त्यांना भरपूर डिजिटल सेवांची ऑफर मिळते व मार्केटविषयीची माहितीही मिळते.”