
संग्रहित छायाचित्र
डहाणू, 25 मे : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनासंदर्भात माकप आमदार विनोद निकोले यांनी ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष मागणी केली असता, त्या मागणीला यश आले आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, दि. 07 एप्रिल 2020 रोजी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्या निवेदनाला माझे जोड निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठवून मागणी केली होती की, सार्वजनिक / सरकारी व्यवस्था – साथीच्या या भयंकर आपत्तीमध्ये सरकारी आरोग्य यंत्रणा मजबूत असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सरकारी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांचे महत्त्व सर्वांना पटले आहे. महाराष्ट्राचे सरकार नक्कीच यादृष्टीने विचार करेल अशी आशा आहे, असे पत्रात म्हटले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन मंत्रालय महिला व बालविकास विभाग यांच्या कडून दि. 20 मे 2020 रोजी शासन निर्णय क्रमांकः एबावि-2020/प्र.क्र.138(भाग1)/