
रत्नागिरी, (आरकेजी) : विविध मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात यासाठी आज अंगणवाडी कर्मचारी सभा (महा) या संघटनेने रत्नागिरीत भव्य मोर्चा काढला. सुमारे दोन हजार अंगणवाडी सेविका मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत आहेत. मानधनाच्या प्रश्नाबरोबरच अनेक प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी अधिकार्यांना निवेदन दिले. अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ मिळावी या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढला गेला. जिल्हा भरातून अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या मोर्चात सहभागी झाल्या.