मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या पोषण आहाराची गैरसोय होऊ नये तसेच कुठल्याही कुपोषीत बालकाची उपासमार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘आशा’ कर्मचाऱ्यांमा
संप करुन कुपोषित बालके, गरोदर महिला, स्तनदा मातांना वेठीस धरण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कृती योग्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून तातडीने अंगणवाड्यांचा ताबा घेण्यात यावा व आशा कर्मचाऱ्यांमार्फत उद्यापासूनच पोषण आहार पुरवठा सुरु करण्यात यावा, असे आदेश महिला-बालविकास सचिव विनिता वेद-सिंगल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे (आयसीडीएस) आयुक्त कमलाकर फंड यांनी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संपासारख्या परिस्थितीसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असणे, सेवानिवृत्ती, अपघात, आजा
आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड म्हणाले, शहरी व ग्रामीण अंगणवाडी केंद्रातून करण्यात येणारा आहार पुरवठा ही आवश्यक सेवा असून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व केंद्र शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही परिस्थितीत बालकांची आहार पोषणाची सेवा बंद ठेवता येत नाही. सध्या संप करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बालकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या बालकांची तसेच गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरी मुली यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना उद्यापासूनच आशा कर्मचाऱ्यांमार्फत आहार पुरवठा केला जाणार आहे. एखाद्या अंगणवाडी केंद्र क्षेत्रात आशा कर्मचारी उपलब्ध नसल्यास बचत गट किंवा इतर यंत्रणेमार्फत आहार पुरवठा सुरु ठेवण्याचे अधिकार ग्राम समितीस देण्यात आले आहेत.
महिला आणि बालविकास विभागामार्फत जारी करण्यात आलेला हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.i
पोषण आहार अत्यावश्यक, सेविकांनी कामावर हजर व्हावे – मंत्री पंकजा मुंडे
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ तसेच त्यांच्या इतर समस्या, मागण्यांसंदर्भात चर्चेचे मार्ग आम्ही नेहमीच खुले ठेवले आहेत. पण आहार पुरवठ्याची तातडीची बाब लक्षात घेऊन त्यांनी आपला संप मागे घेणे आवश्यक आहे. मानधन वाढीसंदर्भात शासन सकारात्मक पाऊले उचलत आहे. पण एवढ्यासाठी बालके, स्तनदा माता, गरोदर महिलांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही. पोषण आहार पुरवठा ही एक महत्वाची सामाजिक योजना असून ती राबविण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. लाखो बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना रोजच्या रोज पोषण आहार देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.