खेड, दि. 21 : अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिक वाचल्यानंतर समाजातील अंधश्रद्धा दूर होणार असून समाजाला योग्य दिशा मिळणार आहे.असे विधान कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुकाराम डफळे यांनी केले.
नवभारत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भरणे कॉलेजच्या वर्धापन दिनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुकाराम डफळे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंनिस जिल्हा अध्यक्ष सचिन गोवळकर संस्थेचे पदाधिकारी भिकू गोवळकर, दत्ताराम धुमक, राजाभाऊ बैकर दत्ता शेट बैकर, प्राचार्य सुरेश तांदळे, डॉ. माळी सर, विनोद साळुंखे, सुभाष सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. डफळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा मुक्त करायचे असेल तर शिक्षणाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्या रुजवणे गरजेचे आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागणी ३२ वर्षे काम करीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम करत आहेत. हे मासिक वाचणीय असून त्याचे सर्वानी सभासद व्हावे, असे मत व्यक्त केले.















