मुंबई, (निसार अली) : अंधेरी-जुहू गल्ली येथे इलेक्ट्रिक बॉक्सजवळ उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाने आज संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. या घटनेत ऑटो जळून खाक झाली. स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. शेजारी असलेल्या इलेक्ट्रिकच्या बॉक्सला जर आग लागली असती तर मोठी हानी झाली असती.