मुंबई : अंधेरीच्या विरा देसाई रोडवर जागतीक दर्जाचे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बनविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया सुरु झाली असून २०१८ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, कब्बडी, खो-खोसह विविध खेळांसाठी येथे जागतिक पातळीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
मल्टी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुख्य मैदानासह सरावासाठीही काही मैदाने बनवण्यात येणार आहेत. क्लबमॅच देखीस येथे खेळण्यात येईल. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्यादृष्टीने हे कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. उपनगरांतील लोकांना हे कॉम्प्लेक्स वरदान ठरणार असून येथे जॉगींग व सायकलींगचीही सुविधा असेल. सुमारे ४९ हजार चौरस मिटर जागेवर हे विस्तारित स्पोर्ट कॉम्प्लेक्स साकारण्यात येणार आहे.