मुंबई : सादर झालेला अर्थसंकल्प ‘अनर्थ’संकल्प आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर केली. पेट्रोल-डिझेलची झालेली करवाढ सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारी आहे. सोन्यावर, आयात पुस्तकांवर करवाढ झाली आहे. बँकांना दिलेला ७० हजार कोटींचा निधी हा अप्रत्यक्षपणे बड्या कर्जबुडव्यांच्या खिशात जाईल. पीपीपी’ मॉडेलद्वारे रेल्वे खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेसेवा महाग होईल. मध्यमवर्गीयांसाठी आयकराची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवणे सरकारला जमले नाही. अर्थंसंकल्प लोकभावनेच्या विरोधात आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. ५ वर्षांचे अपयश झाकण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे, अशी खरमरीत टीका मुंडे यांनी केली.