पेण : अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचा मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार लोकप्रिय गीतकार स्व. अनंत पाटील यांना जाहीर झाला.
श्री. रविंद्र शिसवे साहेब, आयपीएस,पोलीस आयुक्त,लोहमार्ग पोलीस – मुंबई यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. मरणोत्तर दिलेला पुरस्कार त्यांच्या मुलींनी पेण येथील कार्यक्रमात स्वीकारला. या प्रसंगी त्यांच्या सुकन्या सौ.छाया, वंदना,रश्मी, किर्ति ,आणि प्रचिती या उपस्थित होत्या.
लोकप्रिय गीतकार स्व. अनंत पाटील यांच्या पश्चात त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबाबत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नियोजन केल्याबद्दल अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे पाटील यांच्या कुटुबीयांनी मनःपूर्वक आभार मानले.