रत्नागिरी : अनंत गीते म्हणजे संसदेतलं मौनी सभासद अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली.
रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-आरपीआय(कवाडे गट) महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, शेखर निकम, कुमार शेट्ये यांच्यासह माहाआघाडीचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पवार बोलताना म्हणाले की गीतेना तुम्ही 6 वेळा निवडून दिलंत. मी गेली अनेक वर्ष संसदेत आहे, मात्र मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडलं नाही. तसेच आता सत्तेची ताकद असताना सुद्धा काही केलं नाही अशी सडकून टीका यावेळी पवार यांनी यावेळी अनंत गीतेंवर केली.
पवारांच्या भाषणादरम्यान पावसाची हजेरी
शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाचं आगमन झालं. यावेळी सभेला आलेल्या लोकांची मात्र तारांबळ उडाली. त्यामुळे ते मैदान सोडून जाऊ लागली. तर काहीजण हातातील रुमाल, पक्षाचे पट्टे डोक्यावर घेऊ लागले. एका महिलेने डोक्यावर खुर्ची घेतली