कल्याण : कल्याण डोंबिवली शहर परीसरात गेल्या वीस वर्षाहून अधिक कालावधी झालेली शासन नोंदणीकृत असलेली पत्रकार संघटना कल्याण प्रेस क्लबची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यात आगामी दोन वर्षासाठी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून लोकमतचे छायाचित्रकार आनंद मोरे यांची निवड करण्यात आली.
कल्याण प्रेस क्लबच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार व ठाणे वैभवचे रमेश दुधाळकर, सचिव गुजरात समाचारचे विष्णुकुमार चौधरी, खजिनदार सकाळच्या सुचिता करमरकर, तसेच कार्यकारणी सभासद म्हणून दैनिक पत्रिका चे एस. एन. दुबे, जेष्ठ पत्रकार व दैनिक सागरचे प्रमोद भानुशाली, कल्याण नागरिकचे अतुल फडके, कोकण वृत्तांतचे प्रविण आंब्रे, कल्याण प्रजाराज रवी चौधरी तर प्रेस क्लबचे सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार नविन भानुशाली व लोकसत्ताचे दीपक जोशी आदींची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली.
यावेळी आनद मोरे यांनी सांगितले कि, शहर परिसरातील पत्रकाराना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी कार्य करणे, प्रत्येक पत्रकारांचा जीवन विमा तसेच मेडीक्लेम, पोलीस यंत्रणा, महापालिका प्रशासक, प्रशासन व नागरिक यांच्यात संवाद साधण्यासाठी आणि नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी वार्तालाप, परिसंवाद आयोजित करणे. आजच्या महाविद्यालयिन युवापिढीला सायबर सेल व सोशल मिडिया याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांचे सेमिनार आयोजित करणे. पत्रकारिता क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्यांचा विशेष सन्मान यासह अन्य उपक्रम कल्याण प्रेसच्या माध्यमातून व सर्व सहकारी सदस्यांच्या मदतीने राबविण्यात येतील.
तसेच राजकीय पक्षांच्या नेते मंडळी, महानगरपालिका पदाधिकारी आयुक्त व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पत्रकारांच्या हिताच्या सेवा सुविधा व योजना राबविण्याच्या दृष्टीने माजी अध्यक्ष दीपक जोशी, सुचिता करमरकर, नविनभाई भानुशाली, प्रमोद भानुशाली आदींनी मार्गदर्शन केले.