
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहा’चे उद्घाटन . डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा येथे करण्यात आले. या सप्ताहाची उत्साहात सुरुवात दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी झाली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले.
या प्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव बोधनकर, प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे, उपप्राचार्य बी. एस. पाटील, पर्यवेक्षक ए. डी. वानखेडे आणि प्रमुख पाहुणे तसेच वरिष्ठ माध्यम सल्लागार श्री. शैलेश कसबे उपस्थित होते.
यावेळी श्री. कसबे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले,
“यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल, तर अपयशाच्या अडचणीवर मात करून मार्ग काढावा लागतो.”
त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये नवी उमेद जागवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. जी. कोकाटे यांनी केले आणि आयोजनाची जबाबदारी आर. टी. मोरे यांनी पार पाडली.
हा सप्ताह ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान साजरा केला जात असून यामध्ये खालीलप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे:
९ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सामाजिक समता विषयावर निबंध लेखन स्पर्धा
१० एप्रिल – सामाजिक समता विषयावर आधारित पथनाट्य
११ एप्रिल – महात्मा ज्योतिबा फुले जयंती
१२ एप्रिल – संविधान जागर
१३ एप्रिल – स्वच्छता अभियान
१४ एप्रिल – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती















