नवी दिल्ली : अॅमवे इंडिया या देशातील सर्वात मोठ्या थेट विक्री एफएमसीजी कंपनीने आरोग्यदायी जीवनशैलीसाठी संतुलित आहार घेण्याच्या फायद्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी ही मोहीम सादर केली आहे.
योग्य आणि प्रमाणबद्ध पोषण या संकल्पनेवर आधारित #EatHardEatSmart ही मोहीम एका महत्त्वाच्या मुद्दयावर भर देते तो म्हणजे नियमित आहार संतुलित नसल्याने पोषणाची कमतरता निर्माण होणे. शरीराला आवश्यक अशा पोषणतत्त्वांची कमतरता सुयोग्य सप्लिमेंट्सने भरून काढता येऊ शकते.
गेल्या काही वर्षांत जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये झालेल्या बदलांमुळे पोषणाच्या कमतरतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, लोकांच्या आरोग्यावर आणि सुदृढतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. लोकांना अधिक सुकर आणि चांगले आयुष्य जगण्यात साह्य करण्याचे आपले तत्त्व पाळत अॅमवेने योग्य पोषण घेणे आणि त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारण्यास होणारा लाभ याबद्दल जनजागृती करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. #EatHardEatSmart या मोहिमेचा भाग म्हणून कंपनी अॅमवेच्या थेट विक्रेत्यांना आणि ग्राहकांना त्यांच्या नियमित आहारातील पोषणाची दैनंदिन गरज समाजावून सांगण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे.
ही मोहीम सादर करताना अॅमवे इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर संदीप शहा म्हणाले, “दररोज आरोग्यदायी आणि संतुलित आहार घेणे ही कमाल आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मात्र, हल्लीचे वेगवान आयुष्य आणि खाण्याच्या अनियमित सवयी यामुळे भारतीयांमधील पोषणावर परिणाम झाला आहे. माझ्या मते, दैनंदिन आहारासोबत न्युट्रिशनल सप्लिमेंट्स घेतल्याने आपल्या देशाचे आयुष्य दीर्घकाळ सुदृढ राहू शकते. गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार, १० पैकी ९ भारतीयांच्या आहारात प्रथिनांची कमतरता असते. शरीराला दररोज लागणारी पोषणतत्वे कदाचित तुमच्या नियमित आहारात नसतील. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रथिने, आवश्यक पोषणतत्त्वे, जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि ओमेगा-३ दैनंदिन आहारात असण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहोत.” “अॅमवे फक्त प्रोटीन डायटरी सप्लिमेंट विभागातच नाही तर भारतातील जीवनसत्त्वे आणि डायटरी सप्लिमेंट बाजारपेठेत आघाडीवर आहे,” असे ते पुढे म्हणाले.
या मोहिमेबद्दल अॅमवे इंडियाच्या न्युट्रिशन अॅण्ड वेलनेस विभागाचे कॅटेगरी हेड अजय खन्ना म्हणाले, “सगळ्यांसाठीच चांगले आरोग्य आणि सुदृढतेवर भर द्यावा, यावर अॅमवेमध्ये आमचा विश्वास आहे. पोषक, आरोग्यदायी व संतुलित आहार आणि जोडीला शारीरिक व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा पाया आहे. #EatHardEatSmart ही मोहीम सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यातून प्रथिने, आवश्यक पोषकतत्त्वे, जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि ओमेगा-३ यांचे तुमच्या दैनंदिन आहारात असलेले महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. आमच्या ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना ही मोहीम साजेशी आहे.”
प्रथिने, आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स पुरवणाऱ्या अॅमवे न्युट्रिलाइटला या क्षेत्राचा पाया रचण्याचा आणि सप्लिमेंट्संदर्भातील दृष्टिकोन बदलण्याचा ८० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. न्युट्रिलाइट हा जगातील अव्वल क्रमांकाचा व्हिटॅमिन्स आणि डायटरी सप्लिमेंट ब्रँड आहे. अॅमवेने या ब्रँडला अधिक चालना देण्यासाठी फरहान अख्तर यांची न्युट्रिलाइट रेंजचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
तुम्हाला माहीत आहे का:
१० पैकी ९ भारतीयांच्या आहारात प्रथिनांची कमतरता असते.*
बहुतांश भारतीय दररोज फळे आणि भाजेपाल्यांचे अगदी ५ सर्व्हिंग्ससुद्धा घेत नाहीत.**
साधारणपणे भारतीय आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड फारसे नसते. बऱ्याचदा मासे आणि इतर समुद्री आहार, जवस, सब्जा आणि अक्रोड यांसारख्या बिया आणि सुका मेवा, जवसाचे तेल, सोयाबीनचे तेल, कनोला ऑईल याप्रकारचे वनस्पतीजन्य तेल आहारात नसतेच.***













