मुंबई : `फेव्हिकॉल केअरिंग विथ स्टाइल’ या १२ व्या फॅशन शोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी वरूण धवन आणि आलिया भट यांच्यासह शो स्टॉपर म्हणून अबु जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी शानदार रॅम्प वॉक केला. एनएससीआय क्लब येथे कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) च्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
अमिताभ बच्चन यांनी सीपीएएसाठी ११ लाख रुपये इतकी रक्कम देणगी म्हणून दिली. अमिताभ बच्चन म्हणाले की, “ सेवाभावी संस्था या दानावर चालतात. तुम्ही जितके योगदान यात देत आहात, तितकेच ते देण्यासाठी आम्ही आज हातात हात घेऊन येथे सज्ज उभे आहोत. कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त लहान मूल पाहाणे फारच त्रासदायक आहे आणि आपल्या योगदानामुळे समाजातील या विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आणि आरोग्यदायी जगता येणे शक्य होणार आहे.”
फेव्हिकॉलच्या कँपेनचा भाग म्हणून कर्करोगग्रस्तांसाठी एक रॅलीदेखील काढण्यात आली. लोकांनी एकत्र येणे आणि आजाराशी सामना करणे हा या कँपेनचा हेतू आहे
शोमधून उभारण्यात आलेला निधी कर्करोग पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)तर्फे मुलांना होणार्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारानिमित्त सोपविण्यात येईल. अबु जानी आणि संदीप घोसला यांचा मित्रपरिवार, सुझान खान आणि सोनाली बेंद्रे यांनीही या आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला.
माजी क्रिकेटपटू आणि कर्करोगातून मुक्त झालेले डायना एडलुजी आणि निवृत्त भारतीय पोलीस अधिकारी फ्रान्सिस रिबेरिओ यांनी शायना एनसी यांच्या शोसाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या शोला आस्क ग्रूप, क्लब महिंद्रा, फॉरएव्हर मार्क आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आदींचा पाठिंबा लाभला.
अबु जानी आणि संदीप खोसला म्हणाले की, “ गरजवंतांचे सबलीकरण, विशेषतः आरोग्याचा हक्क राबवण्यासाठी आम्हाला सर्वप्रकारे मदत करता येत आहे, ही आमच्यासाठी महत्वाची बाब आहे.