मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती पालिकेतील अभियंता, अधिकारी, कर्मचारी ऋणानुबंध अभियातून साजरी करणार आहेत. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. जयंती उत्साहात साजरी व्हावी यासाठी दैनंदिन कामकाजाचा व्याप सांभाळत कर्मचारी मेहनत घेत आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता करणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त एस.एस शिंदे असणार आहेत.
ऋणानुबंध अभियान, मुंबईतर्फे बाबासाहेंबांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंंत दादरमधील यशवंत नाट्य मंदिरात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. सकाळी ९:३० पासून डॉ. आंबेडकर लिखीत १० पुस्तकांचा संच सवलतीच्या किमतीत फक्त २०० रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत करीअर मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. रावसाहेब कसबे यांचे भारतीय़ लोकशाही व सद्य परिस्थिती यावर व्याख्यान होणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपही करण्यात येणार आहे.
दुपारी १ ते २ यावेळेत भोजनाची व्यवस्था असणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६ या दरम्यान विठ्ठल उमप थिएटर प्रस्तूत माझ्या भिमरायाचा मळा हा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी प्रवेश नि:शुल्क असणार. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य असणार आहे.