मुंबई : कोकण विकास प्रतिष्ठान,फलोत्पादन मंत्रालय व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी शिवाजी पार्कच्या क्रीडा भवन मैदानावर भव्य आंबा महात्सव सुरू केला आहे. दलालांकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांचा आंबा थेट मुंबईकरांपर्यंत पोहोचावा या हेतूने कोकण विकास प्रतिष्ठान दरवर्षी मुंबईत आंबा महोत्सव घेत आहे. यावेळी महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. २० एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आंबा महोत्सव शिवाजीपार्क येथे सुरु राहील.
११ तारखेला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आंबा महोत्सवाचे उदघाटन केले. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, अभिनेत्री निशिगंधा वाङ ,नेहा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबा महोत्सवात एकूण ४० स्टॉल लावण्यात आले आहेत.त्यात कोकणातील हापूस आंब्याबरोबरच,कोकणचे सरबत, खेळणी, मसाले, शोभेच्या वस्तू व आयुर्वेदिक औषधें यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील या आंबा महोत्सवाला लहान मुले, तरुण व नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
२१ एप्रिल ते ३० एप्रिल डॉ.हेगडेवार मैदान,हनुमान रोड,विलेपार्ले(पूर्व), १ मे ते १० मे गावदेवी मैदान, नौपाडा रोड, ठाणे(पश्चिम), ११ मे ते १९ मे न्यू एम,एच.बी.कॉलनी मैदान,बोरिवली(पश्चिम), २० मे ते २८ मे संभाजी राजे मैदान,मुलुंड(पूर्व) या ठिकाणी आंबा महोत्सव होणार आहे.