![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/07/hathkadi-300x200.jpg)
रत्नागिरी, (आरकेजी) : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. जगन्नाथ बाबू चव्हाण असे त्यांचे नाव आहे.
जबर मारहाण करून चव्हाण यांचा खून करण्यात आला. त्यांच्या डोके आणि अंगावर मारहाणीच्या खुणा सापडल्या. हत्येची माहिती मिळताच शिरगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्या कोणी आणि का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.