
~ विद्यार्थी, पालक आणि सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी वन-स्टॉप-डेस्टीनेशन बनण्याचा मानस ~
~ शुल्क भरणा, ऍडमिशन अर्ज, करिअर सल्ला ते शिक्षण विमा, कर्ज आणि नोकरीकरिता अर्ज सर्वे सेवा एकाच छताखाली~
मुंबई : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी पेटीएमने आपल्या सेवांचा विस्तार करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पेटीएम आता शिक्षण आणि नोक-यांच्या क्षेत्रातसुद्धा आपली सेवा पुरवणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना सेवा पुरविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. याकरिता पेटीएम सरकारी आणि खाजगी संस्थांशी भागीदारी करणार आहे. त्यातून शिक्षण आणि सरकारी नोक-यांच्या क्षेत्रात पेमेंट, वाणिज्य, आर्थिक आणि शैक्षणिक सेवा पेटीएम उपलब्ध करून देणार आहे.
‘आम्ही सर्वच पातळ्यांवर विद्यार्थी आणि पालक यांना सुविधा पुरवू इच्छितो. यात अगदी २५,००० शाळा, महाविद्यालये, वेगवेगळे कोर्सेस, परीक्षा इथपासून ते शैक्षणिक संस्थांमधील पेमेंट्स, कोचिंग, स्कॉलरशिप, टेस्टची तयारी, ऍडमिशन अर्ज, विद्यार्थ्यांचा विमा, शैक्षणिक कर्ज आणि बँकिंग इथपर्यंत सेवा आम्ही पुरवणार आहोत’, असे मत पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनीत कौल यांनी सांगितले.
या नव्या विस्ताराअंतर्गत २०,००० खासगी शाळा, १००० उच्च शैक्षणिक संस्था आणि १००० कोचिंग संस्थांमार्फत ३ कोटी ५० लाख ग्राहकांपर्यंत पोचण्याचे पेटीएमचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, इंडियन नेव्ही, अमेटी, व्हीआयटी, मणिपाल, एकेटीयू, आर्मी पब्लिक स्कुल, आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, एनआयटी, यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांशी पेटीएमने याआधीच करार केले आहेत.














