डोंबिवली : कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे आणि मिरा भाईंदर महानगर पालिकांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण रविवारी ओव्हर फ्लो झाले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातील पाणीसाठयाची उच्चतम उंची 72.60 मीटर आहे. धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे बारवी व उल्हासनदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आणि घरगुती वापराचा घेत भविष्यात पाण्याची गरज म्हणून धरणाची उंची वाढविण्याचे 1996 रोजी तिसऱ्या टप्याचे हाती घेऊन 2006 मध्ये नॉन ओव्हर फ्लो आणि ओव्हर फ्लो सेक्शन काम सुरु होऊन डिसेंबर 2008 रोजी पूर्ण झाले होते. परंतु धरणासाठी ताब्यात घेतलेल्या जागेतील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काम आणि ओव्हर फ्लो सेक्शन वरील दरवाज्यांचे काम 2018 रोजी पूर्ण झाल्याने अंतिम टप्यासहित धरणाची उंची 72.60 मीटर झाली असून धरणातील पाण्याची क्षमता 340.48 द.ल.घ.मी. झाली असून आता या धरणावर अवलंबून असणाऱ्यांपाण्याची वर्षभराची चिंता सुटली आहे.
बारवी धारणाचे पाणी सोडल्याने डोंबिवली आयरे भागात पाणी घुसले :
गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा परिणाम अनेक भागासह डोंबिवलीतील आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव ठाकूरवाडी, ठाकुर्ली परिसरालाही बसला आहे. त्यामुळे खाडी किनारी भाग जलमय झाला असून पोलिसानी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात येत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक ६६आयरे गाव ,जयोती नगर, सहकार नगर कोपर शटेशन परीसरात, स्मशान रोड, मध्ये , परिसर पावसामुळे, जलमय ,झाला आहे यामुळे महावितरण कपनीच्या ट्रान्सफार्म मध्ये पाणी घुसून रहिवाश्याना त्रास होऊ नये म्हणून माजी नगरसेवक रवी मट्या पाटील यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली सुमारे 400 लोकांना बोटीतून बाहेर काढून पुरातून सुटका केली. दोन दिवस पावसाने कल्याण डोंबिवलीला झोडपून काढले असून सखल भाग जलमय झाला होता मात्र दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.