मुंबई : कोकण वृत्तसेवा डॉट कॉम या प्रसिद्ध न्यूज पोर्टलच्या निवासी संपादक पदी श्री अक्षय प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठ वर्षांपासून हे संकेतस्थळ वाचकांच्या सेवेत आहे.
अक्षय गायकवाड यांनी वृत्तपत्र, न्युज वेब पोर्टल, न्यूज ऍप येथे काम केले आहे. दहा वर्षांचा त्यांना पत्रकारितेतील विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत विलेपार्ले येथील नामांकित साठे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारित्याची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. दैनिक सकाळ, आपलं महानगर. ई टीव्ही भारत, पब्लिक ऍप आदी ठिकाणी त्यांना कामकाजाचा अनुभव आहे
त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे. तसेच कोकण नृत्य सेवा अंतर्गत असणाऱ्या आपले पर्यावरण या पर्यावरण विषयाला वाहिलेल्या वेबपोर्टलचेही कामकाज अक्षय गायकवाड पाहणार आहेत.