
मुंबई(शांताराम गुडेकर) : अखिल भारतीय शाहिर परीषद मुबई (रत्नागिरी जिल्हा कोकण विभाग)लांजा,राजापूर,रत्नागिरी या तीन तालुक्यासाठी संपर्क प्रमुखपदी गुहागर तालुक्यातील चिखली गावचे सुपूत्र सन्मा. शाहीर संदीप काणसे यांची नियुक्ती करण्यात आली असून अखिल भारतीय शाहिर परीषद मुबई (रत्नागिरी जिल्हा कोकण विभाग) गुहागर,चिपळूण,संगमेश्वर या तीन तालुक्या साठी संपर्क प्रमुखपदी गुहागर तालुक्यातील मासू गावचे सुपूत्र तसेच शंभूराजू घराण्यातील गुरुवर्य शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा याचे शिष्य सन्मानीय शाहीर सुधाकर मास्कर बुवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण भूमिपुत्र संदीप काणसे व सुधाकर मास्कर यांच्या या निवडीबद्दल कोकण विभाग मधील शाहीर वर्गाला आनंद झाला आहे.अनेकांनी निवडीबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि बुवांना पुढील वाटचलीकरिता खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत.